कारची झाडाला धडक, अपघातात एक ठार

Foto
खुलताबाद : परभणीहून कन्नडकडे जाणार्‍या कारनेे सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्ग रोडवरील खुलताबाद जवळ हिमरू शोरूम जवळ झाडाला जोरदार धडक दिली. यात कारमधील एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोनजण बचावले आहे. ही घटना आज दि.१५ रोजी पहाटेच्या सुमारास घडली.

कन्नड सिद्दीक चौक येथील राहणारे अवेस अकबर रंगरेज (१८) वसीम अकबर रंगरेज, अरबाज अफजल रंगरेज हे खाजगी कामानिमित्त कारने (क्रं. एम.एच.२० डी.व्ही. ०८८६)  परभणी येथे गेले होते. काम आटोपून परभणी येथून कारने कन्नडकडे येत  असताना खुुुुलताबाद - औरंगाबाद रोडवर मुगल हिमरू शोरूमजवळील झाडाला पहाटे चार वाजता जोरदार धडक दिली. या घटनेत कारचालका शेजारी बसलेला अवेस अकबर रंगरेज (रा.सिद्दीक,चौक कन्नड) याचा जागीच मृत्यू झाला . तर इतर दोनजण बचावले. पोलिसांनी घटनास्थळी भेटून देवून पंचनामा केला. मयत अवेस रंगरेज यांचे खुलताबाद ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker